Press "Enter" to skip to content

पागोटे चे सरपंच उपसरपंच पद रिक्त

सरपंच भार्गव पाटील यांना जनतेने घरी बसवले : सुमित पाटील यांनी दिला उपसरपंच पदाचा राजीनामा

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उरण तालुक्यातील महत्त्वाच्या असलेल्या पागोटे ग्रामपंचायतचे उपसरपंच सुमित चंद्रकांत पाटील यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे दिला असून वरिष्ठांनी त्यांचा उपसरपंच पदाचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यामुळे पागोटे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद आता पुन्हा रिक्त झाले आहे.

पागोटे ग्रामपंचायतचे उपसरपंच सुमित चंद्रकांत पाटील यांनी दिनांक ११/११/२०२१ रोजी ग्रामपंचायत सदस्य कामिनी किरण तांडले यांच्या समक्ष आपला राजीनामा सरपंच मिलिन केशव तांडेल यांच्याकडे सुपूर्त केला आहे.

सुमित पाटील यांनी दिनांक २२/१२/२०२० या दिवशी उपसरपंच पद स्वीकारला होता.त्या नंतर भार्गव पाटील यांच्या वर अविश्वास ठराव जनतेतून मान्य झाल्यावर दिनांक ०९/०२/२०२१ रोजी पासून ते ०३/११/२०२१ पर्यन्त प्रभारी सरपंच म्हणून कारभार सांभाळला. दैनंदिन जीवनातील व्यस्त कामकाजामुळे तसेच प्रत्येकाला उपसरपंच पदाची संधी मिळावी या दृष्टिकोनातून आपण उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याचे सुमित पाटील यांनी यावेळी सांगितले. यापुढे सामाजिक कार्यातून,विविध चळवळीतून आपण कार्यरत राहणार असल्याचेही सुमित पाटील यांनी यावेळी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.