Press "Enter" to skip to content

आदिवासींना दाखले वाटप

विंधणें आदिवासी वाडीवर जातीचे दाखले आणि रेशन कार्डचे वाटप

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

विंधणें आदिवासी वाडी वरील आदिवासी बांधवांना जातीचे दाखले आणि रेशनकार्डचे वाटप सरपंच निसर्गा डाकी यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर जातीचे दाखले आणि रेशन कार्ड तयार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, रायगड भूषण दत्ता गोंधळी, वाडीवरील शाळेचे मुख्याध्यापक संदीप पाटील सर, आणि श्री कोळी यांनी विशेष मेहनत घेतली.    

प्रा राजेंद्र मढवी सर यांनी जातीच्या दाखल्यांचे महत्त्व लोकांना समजावून सांगितले. माजी सरपंच महेश कातकरी यांनी आदिवासी बांधवांनी एकजुटीने राहण्याचे आवाहन केले. तसेच डाकी यांनी आदिवासी बांधवांना जे लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दीले. ते  सदर कार्यक्रमास वाडी वरील सर्व आदिवासी बांधव उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.