चार फाटा, द्रोणागिरी नोड येथील बेकायदेशीर दुकाने – टपर्या जमिनदोस्त
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण शहराच्या (नगरपरिषदेच्या)हद्दीला लागून असलेल्या चार फाटा येथे तसेच द्रोणागिरी नोड येथे दररोज वाहतूक कोंडी झालेली दिसून येते. येथे विविध टपरे,दुकाने, उद्योगधंदे अनधिकृत व बेकायदेशीर सुरू होते. चार फाटा, द्रोणागिरी नोड येथील जागा शासनाची असूनही या जागेत इतर व्यक्तींचे हातगाडी,दुकाने, टपऱ्या सुरू होते.या रस्त्यावर नागरिकांना चालत प्रवास करणेही मुश्कील झाले होते. शेवटी बेकादेशीर, अनधिकृत बांधकामे, उद्योगधंदे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत सिडको प्रशासनाने उरण चार फाटा तसेच द्रोणागिरी नोड या परिसरातील सर्व अनधिकृत बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त केली.

संतोष जाधव मुख्य नियंत्रक अधिकारी सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली मोहसीन शेख, अजय दुबल, अमित राजपूत-असिस्टंट कंट्रोलर ऑफ अनअथोराईझ कंट्रक्शन, विनोद भुसावळ सर्वेअर सिडको यांनी उरण चार फाटा, द्रोणागिरी नोड येथे विविध वाहने घेऊन कारवाई केली.सिडकोतर्फे 40 कर्मचारी तर उरण पोलीस ठाणे कडून 65 पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामे वाढल्याने व सदर जागा शासनाची असल्याने वरिष्ठांच्या आदेशाने सदर कारवाई केल्याचे सिडकोचे अधिकारी शेख मोहसिन यांनी सांगितले. एकंदरीतच अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामे, दुकानदार यांच्यावर कारवाई केल्याने चार फाटा तसेच द्रोणागिरी परिसराने आता मोकळा श्वास घेतला आहे.








Be First to Comment