Press "Enter" to skip to content

स्मशान भूमितील किमयागारांचा सत्कार

स्मशान भूमितील किमयागारांचा सुयश क्लासेस आवरे तर्फे सत्कार

सिटी बेल | आवरे | राकेश पाटील |

जगातील अंतिम सत्य म्हणजे मृत्यू होय ! सजीव जगत असताना त्याला जिवंत अस म्हणतात. परंतु प्रत्येकाला मृत्यू या कसोटीत उतरायला लागत लोक, नातलग, घरातील व्यक्ती दार व स्मशानभूमीत पर्यन्त येतात. परंतु व्यक्तीच्या शवा ची अखेरीस अंतिम क्रिया करण्याचं कार्य हे स्मशानभूमीतील कलाकार करत असतात ते सुद्धा निस्वार्थ पणे. अगदी कोणत्याही प्रकारच्या मानधानाची अपेक्षा न करता प्रत्येक क्षणी हजर राहतात व प्रेताची संपुर्ण क्रिया संपेपर्यंत थांबत असतात.

आवरे गावातील स्मशान भूमीतील किमयागार श्री तुळशीराम काळ्या गावंड व श्री हिराजी चांगाजी ठाकूर हे होय. सुयश क्लासेस आवरे व निगा फौंउडेशन आवरे च्या माध्यमातून सदर कलाकार यांचा यथोचित मान सन्मान भोलानाथाच्या साक्षीने भोलानाथ च्या दारात संस्थेचे सन्मान चिन्ह ,मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.

सदर प्रसंगी साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी चे सर्वेसर्वा राकेश पाटिल सर , 1997 एस एस सी batch चे सदस्य व थोर शिवभक्त अलंकार पाटील , शैलेश पाटील , विनायक गावंड नवनाथ गावंड , कृष्णा गावंड , सुयश क्लासेस आवरे चे विद्यार्थी होते सदर विद्यार्थी नचा गौरव सुधा प्रशस्तिपत्र देवून केल शिवमन्दिरतील सर्व शिवभक्त उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.