Press "Enter" to skip to content

दिंडींचे पालकमंत्र्यांकडून स्वागत

खांब ते पंढरपूर पायी वारी दिंडींचे पालकमंत्र्यांकडून स्वागत

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील श्री.संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशी व वारकरी सांप्रदाय प्रसारक मंडळ खांब यांच्या वतीने पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या दिंडीचे रायगड जिल्हा पालकमंत्री तथा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या सुतारवाडी येथील गीताबाग नर्सरी येथे मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात स्वागत केले.

स्वा. सु. गुरूवर्य अलिबागकर बाबा, धोंडू महाराज कोलाटकर व गोपाळ महाराज वाजे यांचे कृपात्राखाली दिंडीचे अध्यक्ष ह.भ.प.कृष्णा महाराज जाधव व ह.भ.प.मारूती महाराज कोलाटकर तसेच ह.भ.प.क्रुष्णा महाराज थिटे यांच्या कुशल नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्यात ह.भ.प.नामदेव महाराज यादव,ज्ञानेश्वर लोखंडे, मोरेश्वर मरवडे, क्रुष्णाराम धनवी, अजय पार्ठे,गणेश जाधव,किशोर लोखंडे,शांताराम महाडिक, नारायण लोखंडे,सहादेव बाईत,गोपाळ शिंदे,देविदास भोईर, राम सावंत,राधिका लोखंडे आदी प्रमुख सांप्रदायिक मंडळींसह मोठ्या संख्येने भाविक भक्त व भगिनी सहभागी झाल्या आहेत.

तर पायी वारी दिंडीसाठी शासकीय नियमानुसार सर्व बाबींचे यथायोग्य पद्धतीने पालन करून सदर दिंडी खांब वरून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असल्याची माहितीही दिंडी संचालकांकडून देण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.