Press "Enter" to skip to content

आदिवासी पाड्यात दिवाळी

मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय तर्फे भवरा आदिवासी पाड्यात दिवाळी साजरी

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही जनसेवा हिच ईश्वर सेवा या उक्ती प्रमाणे यावर्षी उरण येथील भवरा येथे डोंगरावर जाऊन आदिवासी पाड्यात ‘हर घर दिवाळी’ साजरी करण्यात आली.या आदिवासी पाडयात एकुण 75 कुटुंबामध्ये दिवाळी साजरी करण्यात आली.

आदिवासी पाड्यातील महिलांना नविन साडी, पुरुषांना नविन वस्त्र, तसेच लहान मुलांसाठी शालेय जीवनाश्यक वस्तु देऊन आणि सर्व कुटुंबाना दिवाळीचा फराळ देत आनंदाने नव्या पद्धतीने दिवाळी पहाट साजरी करण्यात आली.या कार्यक्रमास कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयचे प्राचार्य किशोर शामा , मी उरणकर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल पाटेकर, नगरसेवक नंदकुमार लांबे, नगरसेविका आशा शेलार, नगरसेविका स्नेहल कासारे, नगरसेवक अतुल ठाकूर, महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. हिंगमिरे, तानाजी घ्यार, समाजसेवक रोहित पाटील, संतोष पवार, मंगेश म्हात्रे, विक्रांत म्हात्रे, नयन पाटील आणि मी उरणकर सामाजिक संस्थेच्या वतीने विकास पाटेकर, देवेंद्र मयेकर,बादल म्हात्रे, सनी पाटील, कल्पिता पाटोळे, ध्रुव उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी विशेष म्हणजे श्लोक पाटील मॅडम यांनी आपल्या नर्सरी मधील लहान मुलांना आणुन त्या लहान मुलांमध्ये सामाजिक भावना प्रेरित केल्या. अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी जपत उरण मध्ये दीपावली साजरी करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.