उरण मध्ये क्वीन्स केअर क्लिनिक यांच्या सहयोगाने अमन पोलिक्लिनिकचे उद्घाटन
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण मध्ये क्वीन्स केअर क्लिनिक यांच्या सहयोगाने अमन पोलिक्लिनिकचे उदघाटन करण्यात आले असून एकाच छताखाली हृदयरोग (Cardiology), पोटाचे आजार (Gastrology), स्त्रियांचे आजार (Gynecology), किडनी चे आजार (Nephrology), हाडांचे विकार (Orthopedic), (Physiotherapy), त्वचेचे विकार (Cosmetology), कॅन्सर आजार (Oncology), लहान मुलाचे आजार (Paediatric), सर्वसामान्य आजार (General Physician), सर्वसामान्य शस्त्रक्रिया (General Surgeries) इत्यादी वर तज्ञ डॉक्टर्स कडून इलाज अतिशय कमी खर्चात केला जातो. त्यामुळे गोरगरीब, गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्घाटन प्रसंगी डॉ. आफ्रिन सौदागर-डायरेक्टर क्वीन्स केअर क्लिनिक यांनी केले.

शॉप न 2 , ठाकूर अपार्टमेंट, यश मेडिकल व बाबरे हॉस्पिटल शेजारी, उरण मोरा रोड , उरण शहर येथे आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांची काळजी घेण्याच्या दृष्टीकोणातून अमन पोलिक्लिनिकचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ तालिब सुर्वे प्रोफेसर के ई एम हॉस्पिटल मुंबई, उलमा कमिटी तळोजाचे अध्यक्ष मौलाना यासिन पटेल कासमी, क्वीन हॉस्पिटल शिळफाटाचे डायरेक्टर ऍण्ड मेंबर डॉ अफरीन सौदागर, हेलपिंग स्टार फॉउंडेशनचे वाईस प्रेसिडेंट नूर सोंडे, गायनोकोलॉजिस्ट -डॉ जास्मिन सुर्वे, क्वीन हॉस्पिटलचे मेंबर -शकील अहमद सिद्दीकी, सामाजिक कार्यकर्ते, अखलाख शिलोत्री,अब्रार अखलाख शिलोत्री आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
हेलपिंग स्टार फॉउंडेशनच्या माध्यमातून कमी दरात येथे रुग्णांवर उपचार केल्या जातात.गोर गरीब, गरजू रुग्णांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अब्रार अखलाख शिलोत्री यांनी सांगितले.








Be First to Comment