Press "Enter" to skip to content

दिवाळी फराळ वाटप

सचिन तांडेल मेमोरियल फाऊंडेशन कळंबुसरे मार्फत कोप्रोली आदिवासी वाडीत दिवाळी फराळ वाटप

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

दिवाळी पाडाव्याचे औचित्य साधून आदिवासी भागातील वंचित समाजासोबत दिवाळी साजरी करण्याच्या दृष्टी कोणातून,सामाजिक जाणीव ठेऊन या गरजूंच्या चेहर्‍यावर सुखाचे भाव उमटावे या पेक्षा दुसरा आनंद असूच शकत नाही. ही भावना उराशी बाळगून कोप्रोली आदिवासी वाडी येथे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

सदर वाडी मध्ये 60 ते 70 कुटुंब असून संस्थेच्या सभासदांनी घरोघरी जाऊन आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप केले. सामाजिक कार्याची आवड असणार्‍या रणीता ठाकूर तसेच नयन म्हात्रे यांनी संस्थेच्या या कार्यात मोलाचे सहकार्य केले तसेच सोबत संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार तांडेल, सचिव रत्नाकर केणी, सभासद प्रभूश्वर म्हात्रे, प्रविण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.