Press "Enter" to skip to content

रांगोळी व गडकिल्ले स्पर्धा

जय मातादी ग्रुप दिघोडे तर्फे आयोजित रांगोळी व गडकिल्ले स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |

मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता जय मातादी ग्रुप दिघोडे तर्फे दिघोडे वासियां करिता रांगोळी व गड किल्ले स्पर्धे चे आयोजन जय मातादी ग्रुप तर्फे मयूर घरत व निलेश पाटील यांनी केले होते .नुकताच या स्पर्धे चा पारितोषिक वितरण प्रत्येक स्पर्धकाच्या घरी जाउन करण्यात आला.

या मध्ये रांगोळी स्पर्धे मध्ये रोख रक्कम पाच हजार पंचावन्न व चषका चा मानकरी ठरला शुभम कोळी, द्वितीय क्रमांका चा रोख रक्कम दोन हजार व चषका चा मानकरी ठरला रिद्धी पांडूरंग कोळी तर तृतीय क्रमांक 1000 व चषक पटकावला चेतन पाटील यांनी.

गड किल्ले स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक रोख पाच हजार पंचावन्न व चषका मानकरी आखिल गणेश पाटील ठरला, द्वितीय क्रमांकाचा दोन हजार व चषका मानकरी ठरला जाणता राजा ग्रुप तर तृतीय क्रमांक 1000 व चषक सिद्धी पांडूरंग कोळी हिने पटकावला. तर सार्थक अशोक कोळी, सुमीत घरत, प्रतिक्षा पाटील, पद्माकर पाटील, प्रणाली पाटील, सार्थक वाणी, विनंती ढवळे आदिंना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

स्पर्धेचे परिक्षक म्हणून ग्रामपंचायत सदस्य शरद कोळी, रोहन म्हात्रे, अभिजित पाटील यांनी काम पाहिले.

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिघोडे गावच्या सरपंच सौ.सोनिया मयूर घरत, आश्विन पाटील, मयूर माळी, राकेश म्हात्रे, भावेश म्हात्रे, राजकुमार म्हात्रे आदींसह जयमातादी ग्रुप च्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

सदर कार्यक्रमामुळे दिघोडे गावात आनंदाचे वातावरण पसरले असुन या स्पर्धेच्या माध्यमातून गावातील कलाकार ग्रामस्थांना पहायला मिळाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.