Press "Enter" to skip to content

ट्रॅफिक पोलीसांना प्रथमोपचार पेटी

भाजपा ट्रान्सपोर्ट सेलच्या माध्यमातून प्रथमोपचार पेटी व मास्क वाटप

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

रस्त्यावर छोटे-मोठे एखादे अपघात झाल्यास अपघात ग्रस्त व्यक्तीला तात्पुरते का होईना प्राथमिक सुविधा मिळावेत या दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जपत पोलीस प्रशासना प्रती आदर बाळगत भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री हाजी अरफात शेख, भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे प्रभारी तथा माजी मंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व नवी मुंबई संपर्क प्रमुख निर्गुण कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा ट्रान्सपोर्ट सेल उरण तालुक्याच्या वतीने उरण तालुक्यातील करळ फाटा येथील ट्रॅफिक पोलीस कार्यालयात दोन प्रथमोपचार पेटी तसेच मास्क भेट म्हणून देण्यात आले.

यावेळी उरणमधील वाहतुकीसंदर्भात विविध समस्या व त्यावर काय उपाययोजना करता येईल यासंदर्भात चर्चा करण्यात आली. भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे उद्देश,विविध कार्य याबद्दल माहिती जिल्हा उपाध्यक्ष विकी पाटील यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड यांना दिली.

वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल जिल्हा उपाध्यक्ष विकी पाटील, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल तालुकाध्यक्ष सुदेश पाटील,तालुका चिटणीस ट्रान्सपोर्ट सेल -योगराज पाटील,पूर्व विभाग भाजप अध्यक्ष शशिकांत पाटील, कोप्रोली भाजपा युवा अध्यक्ष अभय पाटील,भाजपा कार्याध्यक्ष कोप्रोली निलेश पाटील ,भाविक पटेल, देवेंद्र पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.भाजपा ट्रान्सपोर्ट सेलच्या कार्याचे व उपक्रमाचे कौतुक करत वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड यांनी भाजपा ट्रान्सपोर्ट सेलच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.