Press "Enter" to skip to content

मुलींना सायकलचे वाटप

उरण तालुक्यातील वशेणी येथे मुलींना मोफत सायकल वाटप कार्यक्रम

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

लक्ष्मी पूजनाच्या शुभमुहूर्तावर वशेणी येथील पाच मुलींना लेडीज सायकलचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन वशेणी इतिहास संपादकीय मंडळाकडून करण्यात आले होते.आपली दिवाळी आनंदीत जावी,प्रदुषण मुक्त जावी, पेट्रोल बचत व्हावी व सुदृढ शरीरयष्टी व्हावी या उद्दात्त हेतूने आपल्या उत्पन्नाचा वाटा समाजात पर्यत पोहोचवणाऱ्या काही दानशूर व्यक्तींनी पाच लेडिज सायकल वशेणी इतिहास संपादकीय मंडळाच्या ताब्यात दिल्या होत्या.

वशेणी गावातील
1)कुमारी रितू तकदीर पाटील
2)कुमारी सानिया कैलास पाटील
3)कुमारी अंतरा उद्देश गावंड
4)कुमारी स्नेहा सचिन पाटील
5)कुमारी सानिका कृष्णा ठाकूर या लाभार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते सदर सायकल वाटप करण्यात आले.

वशेणी गावचे माजी सरपंच प्रसाद पाटील, गावचे पोलिस पाटील दिपक म्हात्रे, समाजाभिमुख शिक्षक विजय पाटील , ग्रामपंचायत सदस्य संदेश गावंड आणि एस एस सी बॅच 1988चे प्रतिनिधी सुरेंद्र म्हात्रे यांच्या शुभहस्ते सायकलींचे वितरण करण्यात आले.या वेळी सदर सायकली दानशूर व्यक्तींकडून मंडळा पर्यत पोहचवण्याचे काम प्रातिनिधिक स्वरूपात मंडळाचे सदस्य कुमार आदिनाथ पाटील यांनी केल्याने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

या प्रसंगी मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे, सदस्य गणेश खोत,पुरूषोत्तम पाटील,कैलास पाटील,हरिश्चंद्र ठाकूर,सतिश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.