Press "Enter" to skip to content

उरणमध्ये दिपावली मिलन

व्यापारी असोसिएशन उरण तर्फे दीपावली मिलन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

दीपावली व नूतन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी व्यापारी असोसिएशन उरण तर्फे तेरापंथी हॉल वाणी आळी उरण शहर येथे दीपावली मिलनचे आयोजन करण्यात आले होते. या दीपावली मिलन कार्यक्रमानिमित्त उरण शहरातील, तालुक्यातील व्यापारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून एकमेकांना दिवाळीच्या प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या.

यावेळी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तथा विद्यमान आमदार महेश बालदी,व्यापारी असोसिएशनचे सचिव हस्तीमल मेहता, उपाध्यक्ष कौशिक शहा, भाजपा तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, उरण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष जयवीन कोळी,भाजपा व्यापारी संयोजक अध्यक्ष हितेश शहा, शहर सचिव भाजप मनोहर सहातीया,उद्योजक राजेंद्र पडते, सुनील पेडणेकर, सुरेंद्र कोठारी, यशवंत गायकवाड, लालू पटेल, निलेश शहा, अजित भिंडे, मनन पटेल, किसनशेठ डांगी, अशोकशेठ बालदी, अशोक जगरूक, पालुशेठ भिंडे, नवीन राजपाल, जस्मिन गॅस, निलेश पाटील आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. आमदार महेश बालदी यांनी सर्वांची आस्थेने विचारपूस करत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.