Press "Enter" to skip to content

आदीवासी बांधवांसोबत दिवाळी

विंधणे सरपंच सौ.निसर्गा डाकी यांच्या कडून आदीवासी बांधवाना मिठाई, ऊटणे व फटाके वाटप

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |

विंधणे ग्रुप ग्राम पंचायत चे माजी सरपंच बोरखार येथील सुरेश डाकी यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा वसा आज त्यांचा मुलगा रोशन डाकी व सुन सरपंच सौ .निसर्गा रोशन डाकी पुढे चालवत आहेत.

सौ.निसर्गा रोशन डाकी ह्या ग्रुप ग्रामपंचायत विंधणे च्या सरपंच झाल्या पासुन त्यानी विविध विकास कामांचा धडाका लावला आहे.या ग्रामपंचायत हद्दीत आदीवासी बांधवां ची दिवाळी आनंदात जाओ व येथील लहान मुलां ना फटाक्यांचा आनंद लूटता यावा या साठी सरपंच सौ.निसर्गा रोशन डाकी यांच्या वतीने आदिवासी वाडी येथे मिठाई .ऊटणे तसेच फटाके वाटप करण्या आले.

तसेच यावेळी विंधणे ग्रामपंचायत अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना मानधन व मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच रोहित नाईक. ज्ञानप्रकाश
पाटील ,ग्राम सुधारणा मंड़ळ बोरखार चे अध्यक्ष रोशन डाकी, शक्ती म्हात्रे , नितीन जोशी माजी उपसरपंच मनीषा कोळी ,माजी उपसरपंच मंगेश घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.