Press "Enter" to skip to content

दिवाळी निमित्त स्पर्धा

सुयश क्लासेस आवरे व निगा फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाईन निबंध, चित्रकला, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा संपन्न

समीर म्हात्रे, कृतुजा गावंड, पार्थिव पाटील , उपासना गावंड यांचे ऑनलाईन निबंध, चित्रकला, वक्तृत्व व रांगोळी स्पर्धेवर वर्चस्व

सिटी बेल | राकेश पाटील | कोप्रोली |

सुयश क्लासेस आवरे व निगा फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमानाने दिपावली निमित्य घेण्यात आलेल्या ऑनलाईन निबंध , चित्रकला , रांगोळी व वक्तृत्व स्पर्धेत समीर म्हात्रे ,(निबंध ) कृतुजा गावंड ,(रांगोळी) पार्थिव पाटील , (चित्रकला)उपासना गावंड (वक्तृत्व)यांचे ऑनलाईन स्पर्धेवर वर्चस्व राहिले. सदर स्पर्धा ही ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील स्पर्ध कांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी होती सदर ऑनलाईन स्पर्धेत बहुसंख्य स्पर्धकांनी भाग घेतल होता.

निबंध स्पर्धेचा निकाल : समिर म्हात्रे , (प्रथम) सायली गावंड (,द्वितीय)प्रियांशी म्हात्रे ,(त्रितीय )

वक्तृत्व स्पर्धा : उपासना गावंड (प्रथम ) वेदांत गावंड (द्वितीय )सारा गावंड (त्रितीय)

चित्रकला स्पर्धा : पार्थिव पाटील (प्रथम ) मिहीर म्हात्रे( द्वितीय )अंकुर गावंड (त्रितीय )

रांगोळी स्पर्धा : ऋतुजा गावंड (प्रथम )साक्षी गावंड (द्वितीय)दिव्या गावंड (त्रितीय )

या स्पर्धकांनी संपूर्ण ऑनलाईन स्पर्धेत बाजी मारली विजयी स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तसेच रसिकांच्या मनोरंजनासाठी शारदा संगीत विद्यालया तर्फे दिपसंध्या कार्यक्रम च आयोजन करण्यात आले. दिपसंध्या कार्यक्रमातीळ सर्व गोड गायकानी गायलेली ओंकार स्वरूपा , गगन सदन तेजोमय , दिपावली मनाये सुहानी , अली माझ्या घरी ही दिवाळी , राजा ललकारी अशी कर्णमधुर गीत ऐकून रसिकांच्या मनावर मोहिनी घातली , तसेच कार्यक्रमा प्रसंगी एक विशेष सत्कार करण्यात आला तो म्हणजे उरण मधील नाव्हा शेवा C H A संघटना या संघटनेचे सामाजिक कार्य पाहिलं तर क्रीडा सामन्याचे आधार चषक आयोजन करून मिळालेली देणगी ही आपला C H A बांधवा अपघात किंवा मृत्यू मुखी झाला तर त्याला किंवा त्याच्या कुटूंबियांना मदत करणारी C H A संघटना म्हणजे आजच्या युगात देवदूत म्हणाव लागेल म्हणूनच आश्या देवदूताचा सन्मान करून नाव्हा सेवा CHA संगघटना चा सत्कार सुयश क्लासेस आवरे तर्फे मान्यवराच्या हस्ते भव्यदिव सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तसेच सर्व स्पर्धकाचा गौरव करण्यात आला.

स्पर्धेचे परिक्षक श्री रवींद्र पाटील सर , सौ उर्मिला म्हात्रे मॅडम श्री संतोष गावंड सर , पूजा मिस्त्री , ऋतुजा गडगे , यांनी परीक्षण केले कार्यक्रम प्रसंगी दीपप्रज्वलन आवरे गावच्या प्रथम नागरिक सरपंच सन्मानीय निराबाई पाटील ,ग्रामपंचायत सदस्या गीतांजली गावंड , विनायक गावंड अलंकार पाटील , यांनी केले तसेच कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे साई कृपा इंफॉर्मशन टेक्नोलॉजी के राकेश पाटील सर, सुफळ आहार चे अध्यक्ष शिवकुमार म्हात्रे, गजानन गावंड , गावातील मृदुनमनी परेश गावंड, न्हावा सेवा C H A संघटनेचे पदाधिकारी आवरे गांवतील सर्व संगीत रसिक , निगा फाऊंडेशन च अध्यक्ष निलेश गावंड प्रीतम स्पोर्ट्स चे प्रशांत म्हात्रे सर , रोहित पाटील,अल्पेश जोशी,प्रितेश म्हात्रें,त्रिजन पाटील,गणेश थळी , नारायण गावंड , मारुती म्हात्रे , गणेश ठाकूर , एल एन भगत सर क्षितिजा म्हात्रे , तन्वी गावंड ,प्रतिभा म्हात्रे , नेहरू युवा केंद्र माजी सदस्य आकाश घरत प्रतिष्ठित नागरिक व स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक , आवरे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवास गावंड सर , व आभार प्रदर्शन नागेंद्र म्हात्रे सर यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.