Press "Enter" to skip to content

आदिवासींची दिवाळी साजरी

पुनाडे आदिवासी बांधवांना दिवाळीनिमित्त कपडे व खाऊचे वाटप

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

सारडे विकास मंच आयोजित रोटरी एज्युकेशन सोसायटीचे रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूल बोरी उरण हायस्कूल अडमिन ऑफिसर पुष्पां कृप मॅडम, प्रिन्सिपल अक्षता घरत मॅडम, मुख्याध्यापिका सन्मानिय संचिता थळी मॅडम, ओ एस प्रकाश गावंड यांच्या सहकार्याने पुनाडे वाडी येथे कपडे व खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात साठी अनेकाने मदतीचा हात पुढे केला. यासाठी आदिवासी बांधवांना मिठाई ही इन्टरपोर्ट ग्लोबल प्रा. लि. चे मार्केटिंग मॅनेजर संदीप जाधव यांच्या मार्फ़त, तर फटाके संदीप पाटील खोपटे नितीन पाटील सारडे, धान्य हे रामनाथ पाटील वशेणी, नाष्टा सुरेश जाधव सर यांच्यातर्फे, बिसलरी पाणी हे राकेश पाटील यांच्या मार्फ़त देऊन पुनाडे आदिवासी बाधवांची दीपावली साजरी केली.

यावेळी खास करून रोटरी एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मेडियम हायस्कूल चे ओ एस श्री प्रकाश गावंड, गावंड मॅडम तसेच महेश ही पाटील, सुयश क्लासेसचे निवास गावंड, साई इन्फॉर्मेशन टेक्नॉंलॉजीचे राकेश पाटील, रामनाथ पाटील, सारडे विकास मंचचे कार्याध्यक्ष रोहित पाटील, अल्पेश जोशी,त्रिजन पाटील, भूषण म्हात्रे, स्नेहा पाटील, रुपाली म्हात्रे, रिया म्हात्रे, श्रीवेद म्हात्रें दानिश या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून पुनाडे आदिवासी बांधवांना कपडे, फटाके,धान्य, मिठाई देऊन दिपावली साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी सारडे विकास मंच अध्यक्ष नागेंद्र म्हात्रें यांनी सर्वाचे आभार मानले. या शाळेच्या माध्यमातून कोमनादेवी ऑक्सिजन पार्क ला आर्थिक मदत म्हणून ३००० रुपये शाळेच्या ऑफिसर पुष्पां कृप मॅडम यांनी दिले आहे. या पैशाचा वापर चागल्या कार्यास केला जाईल असे नागेंद्र म्हात्रे यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.