Press "Enter" to skip to content

प्रदेशाध्यक्षपदी सुरेश पोसतांडेल

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी सुरेश पोसतांडेल

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

उरण नगरपालिकेचे जेष्ठ कर्मचारी सुरेश पोसतांडेल यांची महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

सुरेश पोसतांडेल हे उरण नगरपालिकेत अकाऊंटचे काम पहात आहेत. ते नेहमीच सामाजिक व संघटनेच्या कामात अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संसर्ग कर्मचारी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेऊन निवड केली.

प्रदेशाध्यक्षपदी सुरेश पोसतांडेल यांची निवड जाहीर होताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संघटनेनी आपल्यावर जी प्रदेशाध्यक्षपदाची जबादारी सोपविली आहे, ती यशस्वीपणे सांभाळून कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असा विश्वास नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुरेश पोसतांडेल यांनी व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.