उलवे नोड मध्ये फिरत्या वाहना द्वारे लसीकरण
सिटी बेल | उलवे | विठ्ठल ममताबादे |
कोरोना रोगाचा प्रादुर्भावाचा विचार करता नागरिकांना वेळेत लस मिळावी. नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे या दृष्टीकोणातून शिवसेना व युवासेना उलवे नोडच्या माध्यमातून उलवे नोड मध्ये फिरत्या वाहना द्वारे नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शासनाचे अनेक लसीकरण केंद्र असूनही नागरिकांना लस घेण्यासाठी विविध समस्या येत होत्या. त्यामुळे नागरिकांच्या विविध अडचणी, समस्या लक्षात घेऊन शिवसेना व युवा सेना उलवे नोडच्या वतीने उलवे नोड मधील अनेक विविध भागात लसीकरण करण्यात आले.
शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना व युवासेना उलवे नोड शहराच्या वतीने मोफत कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस 18 वर्षावरील नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी संपूर्ण शहरात सेक्टर वाईज फिरत्या वाहना द्वारे लसीकरण करण्यात आले.फिरता लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवासेना तालुका अधिकारी गौरव म्हात्रे, युवासेना उलवे नोड शहर अधिकारी निलेश पाटील, ऋषिकेश म्हात्रे उप विभाग अधिकारी, शिवसेना शाखा प्रमुख शान पाटील, युवासेना उलवे नोड संघटक राजेश सिंग, उलवे नोड सोशल मिडीया प्रमुख हन्नन पाटणकर,शाखा अधिकारी अंकीत वाढवाना, प्रकाश वाडकर, अरुण जाधव, देव तुरे, शिवसेना तालुका संघटक मर्फी क्रियाडो , उप तालुका प्रमुख हनुमान भोईर, शहर प्रमुख मनोज घरत, उप शहर प्रमुख अशोक घरत , शाखा प्रमुख विनोद पाटील,पंकज पाटील आदी पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.उलवे नोड मध्ये प्रत्येक सेक्टर मध्ये फिरते वाहणाद्वारे लसीकरण करण्यात आल्याने वृद्ध महिला पुरुष, जेष्ठ नागरिक, अपंग, गरोदर महिला, आजारी रुग्ण तसेच परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत शिवसेना व युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.
Be First to Comment