Press "Enter" to skip to content

दा.चां.कडूंचा ८४ वा वाढदिवस साजरा

शिक्षकनेते दा.चां.कडू गुरुजी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सिटी बेल | उरण | प्रतिनिधी |

सेवानिवृत्त शिक्षकनेते दा. चां. कडू गुरुजी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत आदींच्या प्रमुख उपस्थिती लाभली.

दा. चां. कडू गुरुजी हे फक्त शिक्षकांचेच नेते नव्हते तर राजकारणातही मुरलेले असे व्यक्तिमत्व समजले जात असल्याचे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केले. त्यांनी पत्रकारिता करीत असतानाच वादळवारा नावाचे वृत्तपत्र सुरू केले. त्यावेळी या भागातील मोठं मोठ्या आंदोलनाचे वृत्त प्रसिद्ध होत होते. हे करीत असताना त्यांना त्याची झळ पोहचली परंतु त्यांनी कशाची ही पर्वा न करता आपल्या विचारांशी आजपर्यंत ठाम राहिले असल्याचे लोकनेते ठाकूर यांनी सांगत, त्यांचा 90 वा वाढदिवस त्यांच्या जन्मगावी म्हणजे न्हावेखाडी येथे साजरा करण्यात येणार आहे, त्यावेळी मी सर्वांच्या पुढे असेन असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अण्णा हे स्वाभिमानी, करारी बाणा आणि तत्वाशी ठाम असलेले असे रसायन आहे. आज 85 व्या वर्षीही ते या तत्वाशी ठाम असून कोणापुढे न झुकता शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी व्यक्त केले. त्यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाशी लढा देत न्यायालयाची पायरी चढून शिक्षकांना न्याय मिळवून दिला असल्याचे भोईर यांनी सांगितले.

दा. चां. कडू गुरुजी हे शिक्षकांचे नेते नव्हते तर माझे ही राजकीय मार्गदर्शक आहेत. त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रात मला गव्हाण जिल्हा परिषद मतदार संघातुन उमेदवारी देण्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतरच मला उमेदवारी मिळून माझा राजकीय प्रवास सुरु झाला असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितले. त्यामुळे आजही अण्णांचे मी प्रत्येकवेळी मार्गदर्शन घेत असल्याचे घरत यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णांचा 105 वा वाढदिवस साजरा करण्याची संधी आम्हांला मिळो असे त्यांच्या तब्येती वरून दिसत असल्याचे सांगितले.
शिक्षकनेते दा. चां. कडू गुरुजी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपण आज 85 वर्षात पदार्पण करूनही ठणठणीत असल्याचे रहस्य सांगितले. आपण नेत्यांच्या पाठीशी ठाम राहिलो त्याची झळ पोहचली. परंतु मी माझ्या निर्णयाशी ठाम राहिलो असल्याचे सांगितले. माझ्यावर अनेक संकट आली परंतु माझ्या पाठीशी रामशेठ ठाकूर सारखे नेतेमंडळी असल्याने मला कशाचीच भीती वाटत नसल्याचे सांगितले. तसेच वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले.

यावेळी दा. चां. कडू गुरुजी यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जेएनपीटी ट्रस्टी दिनेश पाटील, उत्कर्ष समितीचे गोपाळ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, तालुका अध्यक्ष जे. डी. जोशी, जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर, सरपंच संतोष घरत, माजी सभापती नरेश घरत, भाजपचे चंद्रकांत घरत, सुधीर घरत, दीपक भोईर, सुरेश पाटील, बिल्डर नरसु पाटील, विकास नाईक, रमाकांत गावंड, मार्तंड नाखवा, तेजस पाटील, रमाकांत म्हात्रे आदींसह ग्रामस्थ, पत्रकार मंडळी, कडू परिवार व नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.