Press "Enter" to skip to content

उरण – करंजा एसटी बससेवा सुरु

उरण – करंजा एसटी बससेवा सुरु

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

द्रोणागिरी हायस्कूल करंजा येथील विद्यार्थ्यां करिता उरण एसटी डेपोतुन सकाळी १० वाजता करंजा करिता बस सेवेचे उदघाटन करण्यात आले.

त्याप्रसंगी उरण आगाराचे व्यवस्थापक जुईकर,भुंडे, विद्यालयाचे चेअरमन सिताराम नाखवा, व्हा.चेअरमन के. एल. कोळी ,मुख्याध्यापक ए. टी. पाटील,पालक, विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

सदर सेवेचा लाभ चारफाटा,डाऊर नगर ,मुळेखंड, गणेश नगर,चाणजे येथील विद्यार्थ्यांना होणार आहे.यावेळी चेअरमन सिताराम नाखवा यांनी डेपो व्यवस्थापक जुईकर यांना विनंती केली की एसटीची सेवा करंजा नाक्या पर्यंत (करंजा धक्का )झाली तर‌ ग्रामस्थ व प्रवासी यांना सुद्धा एसटीचा लाभ घेता येईल. एस.टी.फिरण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यास एस.टी.सेवा करंजा धक्या पर्यंत सुरु करता येईल. सध्या तरी कस्टम चाळी पर्यंत एसटी बस सुरू राहील.या सेवेचा ग्रामस्थांनी सुद्धा लाभ घ्यावा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.