Press "Enter" to skip to content

आरोग्य तपासणी शिबिर

रसायनी रोटरी आणि पिल्लई कडून वडमाळवाडी (दुष्मी) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रोटरी क्लब ऑफ रसायनी पाताळगंगा व रसायनी पिल्लई च्यावतीने वडमाळवाडी (दुष्मी)येथे मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.

या शिबिरात 82 लोकांची तपासणी करण्यात आली,तर 14 जणांची डोळे तपासणी करण्यात आली.यावेळी तपासणी झालेल्या नागरिकांना ‌डाॅक्टरांनी व्यवस्थित रित्या मार्गदर्शन केले. या शिबिराला रोटरीतील डॉ. मिलींद भगत,डॉ.प्रतिभा महिंद्रकर, डॉ.धिरज जैन, डॉ.लेखा उचिल,डॉ.हृदया पाटील तर डोळे तपासणी साठी डॉ. विशालाक्षी विंचूरकर यांची मोलाची मदत झाली.

यासाठी रोटरी अध्यक्ष गणेश काळे, सहा. सेक्रेटरी देवेंद्र महिंद्रकर, रो.शारदा काळे, रो.सुनिल भोसले, रो.ऋतुजा भोसले, रो.सुशांत उचिल तसेच पिल्ले काॅलेजच्या कलावती मॅडम व वडमाळ वाडीचे प्राथमिक शिक्षक मंगेश कांबळे सर उपस्थित होते.वडमाळवाडी येथील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी झाल्याने त्यांनी रोटरी क्लब ऑफ रसायनी पाताळगंगा व पिल्लईचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.