उरण तालुका विधी सेवा समिती तर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण तालुक्यातील धुतूम गावात भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सव निमित तालुका विधी सेवा समिती उरण तर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते.

उरण दिवाणी न्यायालय क स्तर चे प्रमुख दिवाणी न्यायाधीश निलेश वाली व मा. सह दिवाणी न्यायाधीश राहुल पोळ आणि अन्य न्यायालयीन अधिकारी वर्ग, तसेच जेष्ठ विधिज्ञ ॲड. पराग म्हात्रे, जेष्ठ विधिज्ञ ॲड. विजय पाटील, ॲड. किशोर ठाकुर, ॲड. योगेश म्हात्रे, ॲड. धीरज डाकी, ॲड. जितेंद्र कातरणे, ॲड. जिवीका डाकी आणि ॲड. वृशाली पाटील आणि उरण तालुका विधी सेवा समिती चे पदाधिकारी डि.आर.ठाकूर यांनी शिबिरामध्ये मार्गदर्शन केले.

ग्रामपंचायत कार्यालय धुतूम येथे पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये सरपंच रेश्मा शरद ठाकूर यांनी सन्माननीय न्यायाधीशांचे स्वागत शाल व बुके देऊन केले. या कार्यक्रमाला माजी उपसरपंच सदानंद ठाकूर, माजी उपसरपंच सुंदर पाटील, माजी, उपसरपंच प्रमोद कडू, सदस्य शरद ठाकूर, ग्रामसेवक विनोद मोरे , ग्रामस्थ रामचंद्र ठाकूर, दत्ता ठाकूर, परशुराम ठाकूर, विनोद ठाकूर आणि इतर सन्माननीय नागरिक उपस्थित होते. या वेळी कायदेतज्ञ, वकील यांनी केलेले मार्गदर्शनाचा फायदा नक्कीच आमच्या ग्रामस्थांना होणार असून आमचे नागरिक कायद्याचे पालन व रक्षण करतील असा विश्वास सरपंच रेश्मा ठाकूर यांनी व्यक्त केला.








Be First to Comment