Press "Enter" to skip to content

छावा क्रंतिविर सेनेचा पद नियुक्ती सोहळा गव्हाण येथे संपन्न

छावा क्रंतिविर सेनेचा पद नियुक्ती सोहळा गव्हाण येथे संपन्न

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

छावा क्रंतिविर सेना,महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष करण भाऊ गायकर यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा अध्यक्ष रोशन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा व पनवेल तालुक्यातील काही पदाधिकारी यांची गव्हाण गावच्या राम मंदिरात पदी नियुक्ती सोहळा पार पडला.

या कार्यक्रम प्रसंगी रायगड जिल्हा अध्यक्ष रोशन पवार,रायगड जिल्हा संपर्क प्रमुख, स्वप्नील घरत,रायगड संघटक राजेश रसाळ, रायगड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पुजाताई संयोग चव्हाण, पनवेल तालुका अध्यक्ष अशोक घरत, उपाध्यक्ष आदित्य वाघ, उरण तालुका अध्यक्ष अभिजीत मोकल, पेण तालुका अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, रसायनी एम आय डी सी विभाग अध्यक्ष भानुदास जांभळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविक आणि स्वागत अशोक घरत आणि नरेंद्र देशमुख यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन केले. त्यानंतर पेण तालुका अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी पेण तालुक्यात छावा क्रांतिवीर सेनेतर्फे केलेल्या कामांची माहिती सांगितली.तसेच छावा संघटनेमध्ये किती ताकद असते ते त्यांनी त्यांच्या केलेल्या कामाच्या कृतीतून उपस्थितांना दाखवून दिले. त्यानंतर जिल्हा प्रवक्ते स्वप्नील घरत यांनी संघटनेबद्दल अधिक माहिती विस्तृतपणे सर्वांना सांगितली. नंतर जिल्हाध्यक्ष रोशन पवार यांनी संघटनेची ध्येय उद्दिष्टे छान पद्धतीने समजावून सांगितले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला.नरेंद्र अनंत देशमुख.गव्हाण (उलवे नोड अध्यक्ष),मनोज जनार्दन कोळी.गव्हाण (उलवे नोड उपाध्यक्ष),भगीरथ गजानन कोळी.गव्हाण (उलवे नोड सल्लागार),किरण बाळाराम देशमुख.गव्हाण (उलवे नोड सचिव),सुनील बारक्या ठाकूर.गव्हाण (उलवे नोड विभाग संघटक),पूजा संयोग चव्हाण. करंजा-उरण.(रायगड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख) या व्यक्तींना पदे देऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी रायगड जिल्हा संघटक राजेश रसाळ यांनी झालेल्या छानशा कार्यक्रमाबद्दल गव्हाण,उलवे नोड भागातील नवनिर्वाचित पदाधिकारी या सर्वांचे अभिनंदन करून उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.