मिशन कवचकुंडल अभियान अंतर्गत लसीकरणाचा लाभ घ्या – आमदार महेंद्र थोरवे
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत तालुक्यात 100 टक्के लसीकरण करू या शासनाच्या आदेशानुसार मिशन कवचकुंडल अभियान अंतर्गत लसीकरणाचा लाभ घ्या असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले आहे.
शासनाने 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत कोव्हीड -19 लसीकरणासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून काल दि.13 ऑक्टोबर रोजी मिशन कवच कुंडल अभियान अंतर्गत कर्जत तालुक्यातील कशेळे येथील कवठेवाडी येथे लसीकरण मोहीम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उदघाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रांत अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज बनसोडे, शिवसेनेचे तालुका संघटक शिवराम बदे, उपतालुका प्रमुख दिलीप ताम्हाणे, रमेश मते, तसेच कशेळे परिसरातील शिवसेना कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य विभागाच्यावतीने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. रमेश कोकरे यांच्या टीम ने लसीकरण केले यावेळी वाडीवरील 60 जणांनी लसीकरण करून घेतले.
Be First to Comment