रोहा तालुक्यातील आमडोशी येथे कोरोना लसीकरण शिबिर
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
रोहा तालुक्यातील आमडोशी येथे प्रार्थमिक आरोग्य केंद्र नागोठणे यांच्या वतीने कोरोना महामारी कोव्हीड १९ चे लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.गेली दोन वर्षांपासुन कोरोना विषाणूच्या महामारीने हैराण झालेल्या नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने कोविडची लस घेणे जरुरी असून रोहा तालुक्यातील बहुतेक खेडेगावात कोरोना लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले परंतु आमडोशी येथे प्रदीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे यांच्या वतीने कोविड १९ च्या लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आला असुन येथील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आला. या शिबिरात स्त्री व पुरूष असे एकूण११५ डोस देण्यात आले.
यावेळी श्रीयोग नवरात्र उत्सव मंडळ सदस्य,रोहा तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, सोपान जांबेकर,प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे आरोग्य सहायक मा.वंदन तांबोळी, मा.आर. डी. हांबिर, मा.मोकल सर सुपर वायझर व्हीं.एम. करंजेकर,पाटील सिस्टर.,ठाकूर सिस्टर, अशा सेविका निधी जांबेकर, महिला बचत गट सी आर पी दिपाली गोळे,बँक सखी वर्षा जांबेकर,ग्राम संघ अध्यक्षा रसिका गोळे उपस्थित होते.
Be First to Comment