Press "Enter" to skip to content

कर्जतमध्ये लसिकरण शिबीर

कर्जत लसीकरण संघर्ष समितीच्यावतीने लसीकरण शिबीर : 260 जणांनी घेतला लाभ

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत लसीकरण संघर्ष समिती, उपजिल्हा रुग्णालय, कर्जत आणि कर्जत नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कोव्हीड -19 लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 260 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

भाई हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळेच्या गाळ्यामध्ये लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. संघर्ष समितीचे ॲड.कैलास मोरे, विनोद पांडे, कृष्णा जाधव, जयवंत म्हसे, प्रशांत उगले,अजय वर्धावे, मन्सूर बोहरी, मुफुद्दल डाभिया, निलेश हरिश्चंद्रे, शिवसेवक गुप्ता, प्रशांत सदावर्ते, सुमेश शेट्ये,प्रभाकर गंगावणे सदस्य उपस्थित होते.

शिबिरास नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेविका प्राची डेरवणकर, नगरसेवक बळवंत घुमरे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, माजी नगरसेविका बिनीता घुमरे, मनसे शहराध्यक्ष समीर चव्हाण, महेंद्र निगुडकर आदींनी भेट दिली.

उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. संगीता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नर्स व्दारका जाधव यांनी लसीकरण केले, त्यांना रुपेश लाड, संकेत पाटील, प्रतिक्षा सिंग,शाहीन मुजावर, अनिता मुकू, रोहित मोरे, विनायक पवार, कैलास रुठे यांनी सहकार्य केले.

मल्हारी माने, चंडिका मित्र मंडळ, भाई हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळा यांचे विशेष सहकार्य म्हणून कर्जत लसीकरण संघर्ष समितीने विशेष आभार मानले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.