🏵️माझी रेणुका माऊली 🏵️
माझी रेणुका माऊली;
जिच्या कृपेची सावली;
पडे अवघ्या या संसारी…
दीनदुबळ्यांची हो माता;
सकलजनांची हो आई…
मधुर जिची वाणी;
वास्तव्य सुंदर लेणी…
वात्सल्यपूर्ण तो पान्हा;
साऱ्या विश्वांस लाभला…
त्रिभुवनी हे शक्तीरूप;
ध्यास प्रतिजीवास लागला…
मांगल्याचा हा अमूल्य ठेवा;
पूजित राही सुवासिनी ही सेवा…
दुष्टप्रवृत्तीविनाशक ही जननी;
विविधरूपे हिची या भूतली…
सकलजनकुळस्वामिनी;
मोठी असे तिची नामावली…
त्रिवार वंदन करता चरणी;
आता सर्व भक्तांस तू तारी…
अशी ही माझी रेणुका माऊली;
जिच्या कृपेची हो सावली;
पडे अवघ्या या संसारी…
Be First to Comment