आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार रुपेश पाटील यांना आर्ट बिट्स फॉउंडेशन पुणे यांचे कडून ‘आर्ट बिट्स महाराष्ट्र युवा कला गौरव पुरस्कार 2021’
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरणचे सारडे गावचे सुपुत्र, उत्तम चित्रकलाकार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार रुपेश पाटील यांना आर्ट बिट्स फॉउंडेशन पुणे यांचे कडून ‘आर्ट बिट्स महाराष्ट्र युवा कला गौरव पुरस्कार 2021’ हा पुरस्कार मिळाला आहे.
दरवर्षी जून जुलै दरम्यान या पुरस्काराची घोषणा होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडल आणि रोख रक्कम आणि आर्टिस्ट ऍप्रॉन असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.उरणचे सुपुत्र रुपेश पाटील यांना राज्यस्तरीय, राष्ट्रीय अनेक पुरस्कार मिळाले आहेत. युवा कला गौरव पुरस्कार रुपेश पाटील यांना मिळाल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








Be First to Comment