उरण तालुक्यातील मोठीजुई ग्रामपंचायतीवर फडकला काँग्रेसचा तिरंगा : महेंद्र घरत यांचा करिष्मा
सिटी बेल | उरण |
उरण तालुक्यातील मोठीजुई ग्रामपंचायती मध्ये आज काँग्रेस पक्षाच्या ललिता जितेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल त्यांचे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महेंद्र घरत यांनी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा स्विकारल्यानंतर जिल्ह्यात अशाप्रकारे काँग्रेस एक पाऊल पुढे असल्याचे दिसून येत आहे.

यावेळी काँग्रेस शेकाप आघाडीचे नेतेमंडळी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी काँग्रेस चे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, जिल्हा परिषद सद्स्य बाजीराव परदेशी, शेकाप नेते रमाकांत पाटील, जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर, माजी जिल्हा परिषद सद्स्य विनोद म्हात्रे, रायगड जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष सौ. संध्याताई ठाकूर, रायगड इंटक जिल्हा अध्यक्ष किरिट पाटील, अखलाक शिलोत्री,अध्यक्ष रमेश परशुराम पाटील, उपाध्यक्ष विनोद रघुनाथ कदम, मा.अध्यक्ष विश्वनाथ हरिचंद्र पाटील, शुभाष गोमाजी जोशी, हरिश्चन्द्र भोईर, केशव भोपी, ग्रामपंचायत सदस्य दीपक भोईर, अश्विनीताई भोईर, तुषार पाटील, शेखर केणी, दिपक ठाकूर,समीर पाटील, उमेश ठाकूर, मनोहर म्हात्रे व मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment