Press "Enter" to skip to content

पुस्तक प्रकाशन सोहळा

कौशिक ठाकूर यांच्या ‘शिक्षणातील माझे नवोपक्रम” पुस्तकाचे प्रकाशन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

शिक्षण क्षेत्रातील विविध अनुभव विद्यार्थी व शिक्षकांसमोर मांडण्यासाठी, विद्यार्थ्यांना -शिक्षकांना एक प्रेरणा मिळावी या दृष्टी कोणातून आदर्श शिक्षक कौशिक ठाकूर यांनी राबविलेल्या उपक्रमावर आधारित असलेल्या ‘शिक्षणातील माझे नवोपक्रम’ या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते श्री भोलानाथ मंदिर, आवरे, उरण तालुका येथे करण्यात आले.

प्रास्तविकमध्ये शिक्षक कौशिक ठाकूर यांनी पुस्तक प्रकाशनाची संकल्पना, शाळेतील विविध चांगले वाईट अनुभव, विविध राबविलेले उपक्रम याची माहिती दिली.समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी -विनायक म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते -संतोष पवार,संस्था चालक -अशोक ठाकूर,नवोदित कथाकर-महेंद्र पाटील, कुस्ती पटू -अमेघा घरत, धाडसी तरुण -प्रतीत पाटील, धाडसी तरुण -अधिकार पाटील यांचा गुलाब पुष्प, सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

पुस्तक प्रकाशनाचे उदघाटन केल्याचे मला आनंद झाला असून शिक्षक कौशिक ठाकूर यांनी सामाजिक जागृतीचे, शिक्षणात एक नवीन क्रांती आणल्याचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सांगितले.कौशिक ठाकूर यांच्या कार्याचे कौतुक करत माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी कौशिक ठाकूर यांच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.

यावेळी जेष्ठ साहित्यिक एल बी पाटील, पंचायत समिती सभापती समिधा म्हात्रे, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, मराठी पत्रकार सघांचे अध्यक्ष घनश्याम कडू, मनसेचे नेते संदेश ठाकूर, मनसे उपतालुकाध्यक्ष -सत्यवान भगत, कामगार नेते महादेव घरत, पंचायत समिती सदस्य दिपक ठाकूर, प्राध्यापक राजेंद्र मढवी, रायगड भूषण राजू मुंबईकर,बी एन डाकी,जेष्ठ शिवसैनिक आत्माराम गावंड, रविंद्र पाटील, एम एस म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत आदर्श शिक्षक कौशिक ठाकूर यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमाचे आयोजन कै मधुकर ठाकूर प्रतिष्ठान आवरे, अष्टविनायक कलामंच आवरे यांनी केले होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक महेश गावंड यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.