नागोठणे गावात उर्दू हायस्कूल येथे महिला लसीकरण मोहीमेचे आयोजन
सिटी बेल | नागोठणे | याकूब सय्यद |
संपूर्ण राज्यात कोविड-१९ लसिकरण मोहिम राबविण्यात येत आहे. त्या निमित्ताने विशेष कोविड लसिकरण मोहिम “मिशन कवच कुंडल” या मोहिमेची जनजागृती करून आज 11 ऑक्टोबर,२०२१ पासून हि लसिकरण मोहिम नागोठणे गावातील महिलांकरीता राबविण्याची सुरूवात झाली.
याकरिता नागोठणे गावात जनजागृती करून रोहा पंचायत समिती सदस्य बिलालश कुरेशी यांनी तालुका वैद्यकिय अधिकारी यांचे मार्गदर्शन नुसार नागोठणे गावचे प्रथम नागरीक सरपंच डाॅ.मिलिंद धात्रक, उपसरपंच मोहनराव नागोठणेकर, ग्रामपंचायत सदस्य, ज्ञानेश्वर साळुंखे आणि गावातील प्रतिष्ठित व सामाजिक कार्यकर्ते सगीरशेठ अधिकारी, अशफाकशेठ पानसरे, सुदेश येरूणकर, गावातील तरूण मंडळी,स्वयंसेवक सदाम दफेदार, प्रकाश कांबळे, समीर भिकन, शाहीद सय्यद इकबाल शिंदी, हुसेन पठाण, मुकेश भोय, सिकंदर कडेवर, विजय शिर्के, आदिल पानसरे, प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक तांबोळी, सर्व अशा सेविका प्राथमिक आरोग्य केंद्र,नागोठणे यांच्या सहयोगने या मोहिमेची जनजागृती करीत आज त्याची सुरूवात केली. तसेच या लसी करण मोहिमेत गावातील १००% महिलांनी सहभाग दर्शविला लसीकरण मोहीम राबविणार्याचे सर्व स्थानिक महिला यांनी जाहीर आभार मानले.अशी माहिती सरपंच श्री.मिलींद धात्रक यांनी पत्रकारांना दिली.
Be First to Comment