जिल्हाधिकाऱ्यांनी केली जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू असलेल्या कामांची पाहणी
सुरु असलेली कामे विहित वेळेत उत्तम दर्जाची करण्याचे दिले निर्देश
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील स्त्री मेडिकल कक्षाचा स्लॅब सहित पी ओ पी कोसळला या हे वृत्त प्रसिद्ध होताच रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, सार्वजनिक बांधकाम उप अभियंता श्री.देवकाते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर व जिल्हा सामान्य रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या स्त्री मेडिकल कक्षातील स्लॅब पी ओ पी सिलिंगवर पडल्याने पी ओ पी सिलिंग खाली असलेल्या दोन महिला यांच्या अंगावर पडला असून त्या जखमी झाले असल्याची चर्चा तेथील काही रुग्णामध्ये होती.
आज प्रत्येक महिन्याला सामान्य रुग्णालयात स्लॅब कोसळत आहे पण याची कोणीही दखल सामान्य रुग्णालयात अधिकारी व प्रशासन घेत नाही .सरकारी निधी फक्त ठेकेदार फक्त खिसे भरण्यासाठी आहे का ? आज प्रत्येक महिन्याला स्लॅब पडतोय पण अधिकारी व जिल्हा प्रशासनाचे डोळे उघडत नाही का ? भविष्यात जर स्लॅब पडून कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण?सरकार कडून आलेला कोट्यावधी निधी याचा उपयोग कुठे केला जातो याचा तपास लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी सातत्याने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती च्या कोकण विभागाकडून होत होती.
जिल्हा रुग्णालयांची बातमी प्रसिद्ध होताच जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट देऊन तेथे नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सोयीसुविधांची, सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. त्याचबरोबर येथील नवीन इमारतीची बांधकाम पाहणी करताना त्यांनी आवश्यक त्या सूचना संबंधितांना दिल्या.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांना जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.
या पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापसातील समन्वयाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रगतीपथावर असलेली कामे उत्तम दर्जाची तसेच नेमून दिलेल्या वेळेतच पूर्ण करावीत, असे निर्देश दिले. तसेच त्यांनी नागरिकांना मास्क वापरा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, सॅनिटायझरचा वापर करा, वारंवार हात स्वच्छ धुवा, घराबाहेर अत्यावश्यक कारणांशिवाय पडू नये, कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, वय वर्ष 45 वरील नागरिकांनी आपले लसीकरण त्वरित करून घ्यावे,असे आवाहनही केले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, सार्वजनिक बांधकाम उप अभियंता जगदीश देवकाते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर व जिल्हा सामान्य रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.








Be First to Comment