उरण तालुका विधीसेल अध्यक्ष पदी मच्छिंद्रनाथ घरत यांची नियुक्ती
सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उरण तालुका विधीसेलच अध्यक्ष पदी मच्छिंद्रनाथ घरत यांची नियुक्ती जाहीर केली.
आपण शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणाना अनुसरून वाटचाल करून शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी, पक्ष बांधणीसाठी आणि विस्तारासाठी नेहमीच प्रयत्नशील राहावे. अशा शुभेच्छा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी यावेळी दिल्या.
यावेळी सोबत उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळककर, विधानसभासंपर्कप्रमुख महादेव घरत, युवासेना विधानसभा अधिकारी नितेश पाटील, व्यापारी असो.अध्यक्ष द्रोणागिरी नोड रविंद पाटील, उपशहरप्रमुख प्रतिक पाटील, गणेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते मणिराम पाटील, रघुनाथ पाटील, नरेश म्हात्रे उपस्थित होते.








Be First to Comment