Press "Enter" to skip to content

माजी आमदार पंडितशेट पाटील यांच्या हस्ते पोयनाड येथील लायन्स व्हिजन आणि हेल्थ क्लिनिकचे उद्घाटन

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

लायन्स क्लब पोयनाड येथील लायन्स व्हिजन आणि हेल्थ क्लिनिकचे उदघाटन माजी आमदार पंडितशेट पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या क्लीनिक द्वारे पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मधुमेह तपासणी, नेत्र तपासणी आणि उपचार, महिला आणि बालरोग तपासणी आणि उपचार यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणि डॉक्टर्स कमीत कमी दरांत उपलब्ध करण्याचे सेवाभावी काम लायन्स क्लब पोयनाड यांच्या मार्फत करण्याचा प्रयत्न केला आहे. जनसेवेचे कार्यासाठी लायन्स क्लब पोयनाडच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी राजिप सदस्या चित्र आस्वाद पाटील, आंबेपूर ग्रामपंचायत सरपंच सुमन पाटील, लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ लायन्स लुनकरन तावरी, जीएसटी चेयरमन एमजेएफ लायन्स. मनीष लाडगे, एक्झ्यु . कॅबिनेट ट्रेझरर एमजेएफ ला. अनिल म्हात्रे, एक्झ्यु . कॅबिनेट सेक्रेटरी नयन कवळे, रिजन चेयरमन मा. लायन्स अरविंद घरत, झोन चेयरमन लायन्स प्रियदर्शनी पाटील, डॉ. शुभदा कुडतरकर, पोयनाड लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. प्रमोद पाटील, सेक्रेटरी लायन्स प्रगती सिनकर, खजिनदार लायन्स विकास पाटील, उपाध्यक्ष लायन्स विकास पाटील, महेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत हा उदघाटन सोहळा पार पडला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.