छोट्या छोट्या आजारातून मोठा आजारही उदभवू शकतो तरी नागरिकांनी स्वतः च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका : डॉ. निहा राऊत
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
आजच्या दगदगीच्या जीवनात आरोग्याची हेळसांड मोठया प्रमाणात होत आहे. कोणीही आरोग्याकडे लक्ष देत नाही. विशेषतः महिलांमध्ये हिमोग्लोबिन कॅल्शियम लोह यांची कमतरता मोठ्या प्रमाणात असते. ग्रामीण भागात आरोग्यविषयक सुविधा नसल्याने नागरिक हे आरोग्यासाठी आवश्यक असणारे उपचारासाठीही दुर्लक्ष करीत आहेत. छोट्या छोट्या आजारातून मोठा आजारही उदभवू शकतो तरी नागरिकांनी स्वतः च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. असे प्रतिपादन डॉ. निहा राऊत यांनी अलिबाग तालुक्यातील कुसूंबळे येथे आयोजित आरोग्य शिबिरात केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिजन चेअरमन अरविंद घरत तर सामाजिक कार्यकर्ते राजा केणी,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, झोनल चेअरमन रवींद्र घरत, लायन्स क्लब ऑफ श्रीबाग अध्यक्ष बाबासाहेब चौगूले, उपाध्यक्षा ॲड. कला पाटील, डॉ. निहा राऊत, डॉ. राजाराम हुलवान यांची प्रमुख उपस्थिती होते. लायन्स क्लब ऑफ श्रीबाग, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड अलिबाग, जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, माणुसकी प्रतिष्ठान वायशेत, कुसुंबळे ग्रुप ग्रामपंचायत तसेच तेजस्विनी फाऊंडेशन अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच कुसुंबळे ग्रुप ग्रामपंचायत येथे आरोग्य, रक्त आणि दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. ॲड.निहा राऊत यांनी सामाजिक कार्यातून केलेल्या उपक्रमात कोणताही राजकीय हेतू न ठेवता केवळ ग्रामस्थांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल यादृष्टीकोनातून या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे स्पष्ट करीत समाजकार्यामध्ये कोणी राजकारण आणू नये असे मत त्यांनी व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद घरत यांनी तळागाळातील लोकांना शिबिराचा लाभ मिळावा असे मत व्यक्त करीत असताना लायन्स क्लब करीत असलेल्या कार्याची माहिती दिली.

आरोग्य शिबिरास ग्रामस्थांनी प्रतिसाद २५६ शिबिरार्थिंनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. अंगणवाडीतील लाभार्थी यांची देखील यावेळी योग्य ती तपासणी करून त्यांच्या मातांना योग्य तो सल्ला देवून गरज असेल त्यांना औषधे वाटप केली गेली.
लायन्स क्लब ऑफ श्रीबाग चे अध्यक्ष बाबासाहेब चौगूले, उपाध्यक्षा ॲड. कला पाटील, डॉ. ॲड. निहा माजी अध्यक्ष लायन्स क्लब विजय वनगे, खजिनदार तानाजी भोसले, डॉ स्मिता पाटील, कुसुंबळे ग्रुप ग्राम पंचायत उपसरपंच रसिका केणी, ग्रामसेवक गणेश म्हात्रे, डॉ. रश्मी भगत, डॉ. तेजश्री नाईक, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक विभाग रायगड अलिबाग जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने, ओषध निर्माता दिपेश, तंत्रज्ञ सुजाता तुळपुळे, समुपदेशक अनिल खंडाळे, रोहन रत्नाकर, ग्रुप ग्रामपंचायत सदस्या अर्चना पाटील, जागृती पाटील, अपर्णा कोठेकर, मीनाक्षी खरसंबळे, उत्तम पाटील, प्रमोद पाटील तसेच तंटामुक्त समिती अध्यक्ष गजानन खरसंबळे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थितीत होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिविता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबळे सदस्य जीवन पाटील यांनी केले व लायन्स क्लब ऑफ श्रीबागचे हा स्तुत्य उपक्रम कुसुंबळे येथे आयोजित केल्याबद्दल अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांनी लायन्स क्लब ऑफ श्रीबाग चे आभार मानले.








Be First to Comment