Press "Enter" to skip to content

स्व.रा.ग.गावंड सामाजिक, शैक्षणिक संस्थेतर्फे आदर्श शिक्षक कौशिक ठाकूर यांचा सत्कार

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सारडे, उरण येथे कार्यरत असणारे उपक्रमशील शिक्षक, आवरे गावचे सुपुत्र कौशिक मधुकर ठाकूर यांनी शिक्षण क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना रायगड जिल्हा परिषद अलिबाग शिक्षण विभाग यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१ हा शिक्षण क्षेत्रातील मानाचा पुरस्कार ०२ ऑक्टोबर २०२१ रोजी कर्जत येथे देण्यात आला.

आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याचे औचित्य साधून कौशिक ठाकूर यांचा रामदास गवत्या गावंड परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. कौशिक ठाकूर यांना मायेची शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन आई श्रीम इंदूबाई रामदास गावंड यांच्या हस्ते शुभाआशिर्वाद देऊन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी स्व.रा.ग.गावंड संस्थेचे अध्यक्ष संदिप गावंड,नामदेव गावंड, गणेश गावंड, सुनिल गावंड सर,नितीन गावंड,उरण शिक्षक पतपेढीचे चेअरमन नवनीत गावंड,डॉ संदेश गावंड साईनाथ गावंड सर, रुपम गावंड सर आणि परिवार उपस्थित होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.