Press "Enter" to skip to content

रसायनी पाताळगंगा रोटरी क्लबकडून 470 जणांची मोफत मधुमेह तपासणी

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

एरिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी जागतिक रक्त मधुमेह तपासणी शिबिर घेण्यात आले.त्यासाठी रोटरी इंटरनॅशनलतर्फे सर्व रोटरी क्लबने सहभाग घेतला होता.यावेळी रोटरी क्लब ऑफ रसायनी पाताळगंगा तर्फे 470 जणांची मोफत मधुमेह तपासणी करण्यात आली.

यामध्ये रोटरी तील डाॅक्टरांचे फार मोलाचे सहकार्य लाभले.रसायनीतील डॉ.मिलिंद भगत, डॉ.धीरज जैन, डॉ.प्रतिभा महिंद्रकर, डॉ.हृदया पाटील, डॉ.राजन बागडे, डॉ.मंगेश बांग यांच्या क्लिनिकमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी रोटरॅक्ट अध्यक्ष रोहन गावडे, सेक्रेटरी समृध्द उचिल यांनी प्रत्येक क्लिनिकला तीन असे रोटरॅक्टर मदतीसाठी ठेवले होते.

या मधुमेह तपासणी शिबिराला रसायनी पाताळगंगा रोटरी क्लबचे अध्यक्ष गणेश काळे, सेक्रेटरी देवेंद्र महिंद्रकर, शारदा काळे, अनुराधा होनावळे, बाळकृष्ण होनावळे, गणेश वर्तंक विजय पाटील, अमित शहा, सुनिल भोसले,दिपक चौधरी, उमाताई मुंढे, वर्षां पाटील, जयश्री पाटील,ऋतुजा भोसले,मित्तल शहा या सर्व रोटरॅक्ट टिमने मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.