Press "Enter" to skip to content

जासई हायस्कूल मध्ये मास्क वाटप कार्यक्रम संपन्न

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा.पाटील ज्युनिअर कॉलेज जासई या विद्यालयात सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात दिर्घ लॉकडाऊन नंतर सोमवार दिनांक 4/10/2021 रोजी शाळा सुरू झाली.शाळा सुरू होण्या साठी शिक्षण खात्याच्या धोरणानुसार शाळेची झालेली तयारी पाहणी करून गरजू विद्यार्थ्यांना स्वखर्चाने 500 मास्कचे वाटप शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष आणि भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील यांनी केले.

या साठी ते स्वतः गाव कमिटीचे अध्यक्ष यशवंत घरत,सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य गोपीनाथ ठाकूर यांच्या समवेत हजर राहून शाळेची वर्ग स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,शौचालय सुविधा यांची पाहणी केली.

शाळेच्या पहिल्या दिवशी सुरुवातीस हजर असलेल्या विद्यार्थी – पालक यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले . त्या नंतर दररोज शाळेत विद्यार्थ्यांना यावे लागणार असल्याने त्यांना मास्क ची नितांत गरज लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी स्वखर्चाने आपल्या मार्फत विद्यार्थ्यांना 500 मास्क चे वाटप केले.ज्या काही विद्यार्थ्यांचे मास्क तुटके होते,खराब होते तर काहींनी मास्क परिधान केले नव्हते अशांना व इतर गरजू विद्यार्थ्यांना आपल्या सुरेश पाटील व शाळेचे उप प्राचार्य मा.पी.पी.मोरे, पर्यवेक्षक साळुंखे आर. एस.यांच्या हस्ते वाटप करण्यात आले .

या मास्क वाटप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत सेवक संघाचे उप – अध्यक्ष नुरा शेख सर यांनी केले.या कोरोना काळात मास्क या महत्त्वाच्या साधनाची गरज लक्षात घेऊन स्वतः 500 मास्क विद्यार्थ्यांना स्वखर्चातून वाटप केल्या बद्दल म्हात्रे जी.आर.यांनी शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अधक्ष सुरेश पाटील यांचे विशेष आभार मानले.तसेच उपस्थित विद्यार्थी – पालक यांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.