Press "Enter" to skip to content

छोट्या उपक्रमातून मोठा आनंद देणारे वशेणी इतिहास संपादकीय मंडळ

वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने केले वशेणी दादर फाटा रस्त्यावरील गेली वर्षभर बंद असणारे पथदिवे स्वखर्चाने प्रकाशमान

सिटी बेल | वशेणी | उरण |

वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने 2018 पासून अनेक छोटे छोटे उपक्रम राबवले आहेत. उपक्रम जरी छोटे असले तरी समाजाला कोट्यावधीचा आनंद देण्याचे काम वशेणी इतिहास संपादकीय मंडळ करते असे गौरवोद्गार उरण पंचायत समितीच्या सभापती सौ.समिधा निलेश म्हात्रे यांनी वशेणी येथे संपन्न झालेल्या पथदिवे प्रकाशीत करण्याच्या कार्यक्रमात काढले.

महत्मा गांधी जयंती आणि एकादशी च्या शुभमुहूर्तावर वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने वशेणी दादर फाटा रस्त्यावरील गेली वर्षभर बंद असणारे पथदिवे स्वखर्चाने प्रकाशमान करण्याचा कार्यक्रम आयोजीत केला होता.

सदर पथदिवे प्रकाशमान कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती सौ.समिधा म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. एकूण 23 पथदिवे प्रकाशीत करण्यात आले.

या वेळी वशेणी गावचे सरपंच जीवन गावंड, सामाजिक कार्यकर्ते निलेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य संदेश गावंड, डाॅ.रविंद्र गावंड, बी.जे. म्हात्रे, अनंत तांडेल, जगन्नाथ म्हात्रे, बळीराम म्हात्रे,नरेश पाटील ,घनश्याम पाटील, गणेश खोत, पराग पाटील, अनंत पाटील ,महेंद्र पाटील , सुनिल ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी वशेणी इतिहास संपादकीय मंडळा कडून नवोदय परिक्षेत यश संपादन करून केंद्रीय शिक्षणासाठी माणगाव निजामपूर येथे निवड झालेल्या कुमारी मृणल प्रणय पाटील हीचा प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन विशेष गौरव करण्यात आला. याच वेळी मृणल पाटील हीला पुढील शिक्षणास मदत व्हावी म्हणून सौ.समिधा म्हात्रे यांनी आर्थिक स्वरूपात रोख तीन हजार रूपयांची मदत देखील केली.

तर ऋषी पंचमीच्या दिवशी पिरकोन गावच्या तलावात बुडणा-या महिलांचे प्राण वाचवणा-या कुमार प्रतिक गौतम पाटील,कुमार अधिकार कुंदन पाटील यांचा मंडळा कडून प्रमाणपत्र व भेटवस्तू, पुष्प गुच्छ व शाॅल देऊन शौर्य सन्मान करण्यात आला. तसेच आवरे पंचायत समिती गणातून प्रथमच सौ.समिधा निलेश म्हात्रे यांची सभापती पदावर बिनविरोध निवड झाल्याने त्यांचाही मंडळा कडून भव्य सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुमार आदिनाथ पाटील, श्री.कैलास पाटील यांनी मेहनत घेतली.

या कार्यक्रमात बोलताना गावचे सरपंच जीवन गावंड म्हणाले की, गावाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या विस्तारा बरोबर नागरी समस्या देखील वाढत आहेत. तेव्हा केवळ ग्रामपंचायतीवर अवलंबून नराहता गावात कार्यरत असणा-या सामाजिक सांस्कृतिक मंडळाने गाव सुधारणे साठी प्रयत्न करावा . आणि वशेणी इतिहास संपादकीय मंडळ नेहमीच गाव सुधारणे साठी हातभार लावतो.म्हणून या मंडळाचे खूप खूप कौतुक !

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.