मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी स्मायली बॉलचे वाटप : जाणुण घ्या या बाॅलचा कसा करावा उपयोग
सिटी बेल | नवी मुंबई |
रिक्षा चालक हा कोणत्याही शहरातील एक महत्वाचा घटक असतो. नागरिकांना आपल्या इच्छुक स्थळी पोहचविण्यासाठी रिक्षा चालक हे सदैव तत्पर असतात परंतु ते स्वतःच्या आरोग्यविषयी तितके जागरूक नसल्याचे निरीक्षण नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे करण्यात आले.
नुकताच साजरा झालेल्या जागतिक हृदयदिनानिमित्त संपूर्ण आठवड्यात आरोग्यविषयक अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. मोफत आरोग्य तपासणी, आरोग्य मार्गदर्शन शिबीरे व डॉक्टरांचा मोफत मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. याचनिमित्ताने नेरुळ येथील रिक्षाचालकांसाठी एक अनोखा उपक्रम सुद्धा आयोजित केला होता. यामध्ये रिक्षाचालकांना मानसिक ताण तणाव सूर करण्यासाठी स्मायली बॉल चे वाटप करण्यात आले तसेच हृदयविकार असलेल्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये आणताना व घरी नेताना कशी काळजी घ्यावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

याविषयी अधिक माहिती देताना नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, ” आमच्या पाहणीनुसार वाहतूक क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे अनेक रिक्षाचालक हे मानसिक ताणतणावातून जात असल्याचे दिसून आले. कोरोना महामारीमुळे अनेक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली होती.
आता सर्व व्यवहार हळू हळू सुरळीत होता असून रिक्षाचालक एका मोठ्या बदलाला सामोरे जात आहेत अशा वेळी त्यांनी मानसिक ताणतणावातून स्वतःला सावरायला हवे, म्हणूनच आम्ही नेरुळ येथील ७० रिक्षाचालकांना स्मायली बॉलचे वाटप केले.
खड्डय़ांमुळे धक्के बसून पाठदुखी आणि मानदुखीचा विकार जडला असून नियमित प्रदूषणामुळेही अनेक रिक्षा चालकांना चालकांना श्वसनाचाही आजार बळावत असल्याचे सुद्धा समोर आले आहे.








Be First to Comment