सिटी बेल | उरण | वैशाली कडू |
सारडे विकास मंचला संतोष पाटील यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे कोमनादेवीकडे जाणारा रस्ता खुला करण्यात आला. त्यामुळे भाविकांना देवीचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे.
सारडे गावचे संतोष बळीराम पाटील सर यांनी सारडे विकास मंच कार्य पाहून आपण सहकार्य कराव या उदात्त हेतूने सारडे विकास मंच चे कार्याध्यक्ष रोहित पाटील यांच्याकडे कोमनादेवी पार्क मध्ये भेट दिल्या नंतर 2000 रुपये सुपूर्त केले होते. या पैशाचा विनियोग योग्य कार्यासाठी व्हावा यासाठी नवरात्री उत्सव जवळ आल्याने देवीच्या दर्शनासाठी भाविकांना रस्ता सुखकर व्हावा यासाठी दिलेल्या पैशात सारडे गावचे निशिकांत गावंड यांनी चार दिवस हे गवत कापून कोमनादेवीकडे जाणारा रस्ता खुला करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेणे सुलभ होणार आहे.
संतोष पाटील यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे कोमनादेवीचा मार्ग सुकर झाल्याने त्यांचे सारडे विकास मंचने आभार मानले आहे.








Be First to Comment