सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी संपूर्ण भारतभर जागरुकता व संपर्क अभियान सुरू असून संपूर्ण देशात 2/10/2021ते 14/11/2021 दरम्यान या अभियानांतर्गत सभा, बैठका, विविध उपक्रमाद्वारे विविध कायदेविषयक जनजागृती करण्यात येणार आहे. उरण तालुका विधी सेवा समिती तर्फे जागरूकता व संपर्क अभियानाचे औचित्य साधून उरण न्यायालय येथे कौटुंबिक कायदे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

दिवाणी न्यायाधीश निलेश. एम. वाली,सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती प्रियांका पठाडे यांनी कौटुंबिक कायद्याविषयी माहिती दिली. महिलांवर होणारे अत्याचार व त्यावर उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी ॲड. राजेंद्र भानुशाली, ॲड पराग म्हात्रे, ॲड. प्रतिभा भालेराव, ॲड. धीरज डाकी, ॲड. नासीर शेख, दक्षता समिती उरण सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या सीमा घरत,सामिया बुबेरे, यशवंत ठाकुर,डी आर ठाकुर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.









Be First to Comment