सिटी बेल | उरण | प्रशांत म्हात्रे |
सारडे विकास मंच च्या संकल्पना ह्या बहुमोल असतात. सारडे विकास मंच हा नागेंद्र म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या समाज उपयोगी विकास मंच आहे. यावेळी जे जे आहे टाकाऊ त्यापासून टिकावू वस्तू तयार करून त्यांनी गणरायाचे चरणी अर्पण केल्या.
जे पर्यटक कोमनदेवी मध्ये जातात त्यांच्या पायाला सदर बाटलीच्या काचा लागू नये पर्यटकांना दुखापत होऊ नये यासाठी तीच बाटली उचलून तिचे रूपांतर देवघरात दिव्यात तेल टाकण्यासाठी, अंगणात तुळशीच्या ठिकाणी दिवाबत्ती करण्यासाठी तसेच मोबाईल किंवा पेन ठेवण्यासाठी करता येईल अशा वस्तू बनविण्यात आल्या.
या प्रकारे टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू तयार केल्या व प्रत्येक गणरायाचे चरणी सदर उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. अश्या प्रकारे सारडे विकास मंचच्या पर्यवरण पूरक उपक्रमात छोट्या मोठ्या सारडे विकास मंच च्या शिलेदार यांनी महत्वाची भूमिका बजावली.







Be First to Comment