Press "Enter" to skip to content

जागतिक हृदयदिनानिमित्त वाशी येथील अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची हृदय तपासणी

सिटी बेल | नवी मुंबई |

नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या व त्यामुळे येणारा कामाचा ताण लक्षात घेता काल जागतिक हृदयदिनानिमित्त तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या वतीने वाशी येथील अग्निशमन दलातील ३५ कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

अग्निशमन विभाग हा अत्यावश्यक आणि कार्यतत्पर असा विभाग आहे. त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारच्या वर्दीवर काम करताना अधिकारी आणि कर्मचारी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असला पाहिजे, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तो शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे याच सामाजिक भावनेतून तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे हे आरोग्य शिबीर आयोजित केले होते.

या शिबीरात रक्तदाब, मधुमेह, ईसीजी  तसेच डोळे तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी वाशी येथील अग्निशमन विभागाचे डिव्हिजनल अधिकारी पुरुषोत्तम जाधव याचे विशेष सहकार्य लाभले. कोरोनाच्या या जागतिक संकट विरोधात लढण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आलेला होता अशावेळी अग्निशमन दलाच्या जवानांची रहिवाशी सोसायट्या तसेच गर्दीच्या ठिकाणी जंतुनाशक फवारणी करणे तसेच उपचार केंद्रात सुविधा पुरविणे अशी अनेक समाजपयोगी कामे केली होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.