Press "Enter" to skip to content

देवकान्हे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना लसिकरण

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील देवकान्हे ग्रा.पंचायत वतीने देवकान्हे गावातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसिकरण कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला.

रोहे ग्रामीण उपजिल्हा रूग्णालय यांच्या तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी यांच्या सहकार्याने व ग्रा. पंचायत हद्दीतील गावांमध्ये कोरोना लसीकरण मोहिम ग्रा. पं.हद्दीतील गावागावात राबविण्यात येत आहे.

या मोहीमेतंर्गत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस सुमारे २०० लाभार्थ्यांना देण्यात आला. यावेळी येथील सरपंच वसंत भोईर, सदस्य दयाराम भोईर व अन्य
सदस्य तसेच अंगणवाडी सेविका, आशासेविका उपस्थित होत्या. उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय रोहा व प्रा.आरोग्य केंद्र आंबेवाडी यांच्या महत्त्वपूर्ण सहकार्याने ग्रा.पं. सरपंच वसंत भोईर व सर्व सदस्य यांच्या विशेष प्रयत्नातून राबविण्यात आलेल्या कोरोना लसिकरण मोहिमेबद्दल रहिवासी वर्गाकडून स्वागत करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.