Press "Enter" to skip to content

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा जे.एन.पी.टी.- सिडको परीसरामध्ये पाहणी दौरा

ठाणे-बेलापूर-जे.एन.पी.टी. रस्त्यावरील ट्राफिक कोंडी व पार्किंग प्रश्न, शिवस्मारक, जे.एन.पी.टी. परीसराची मंत्र्यांनी केली पाहणी

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

बुधवार दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उरण तालुक्यातील शिवस्मारक, जे.एन.पी.टी. येथे भेट दिली.

यावेळी ठाणे-बेलापूर-जे.एन.पी.टी. रस्त्यावर वाहनांची होणारी ट्राफिक कोंडी व पार्किंग प्रश्न यावर लवकरात लवकर उपाययोजना करून सदर प्रश्न सोडविण्या संदर्भात संबधित विभागाला मंत्री महोदयांनी आदेश दिले.

यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, माजी जिल्हाप्रमुख/विश्वस्त जे.एन.पी.टी. दिनेश पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, विधानसभा संघटक सदानंदराव भोसले, तालुकासंघटक बी.एन.डाकी, शिवसेना गटनेता गणेश शिंदे, शिवसेना शहरप्रमुख विनोद म्हात्रे, उपतालुकाप्रमुख प्रदिप ठाकूर, उपतालुकासंघटक के.एम. घरत, उपतालुकासंघटक अमित भगत, विभागप्रमुख संदेश पाटील, जि.प.सदस्य विजय भोईर, पं.स.सदस्य दिपक ठाकूर, पं.स.सदस्य हिराजी घरत, युवासेना विधानसभा अधिकारी नितेश पाटील, तालुका युवासेना अधिकारी हितेश पाटील, वैद्यकीय कक्षप्रमुख रमेश म्हात्रे, महिला उपजिल्हा संघटिका ममता पाटील, महिला विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, तालुका संघटिका भावना म्हात्रे, तालुका संघटिका(शहर) सुजाता गायकवाड, तसेच सिडको चे अधिकारी वर्ग, जे.एन.पी.टी. चे अधिकारी वर्ग, पोलीस अधिकारी वर्ग, तहसिलदार, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, उपतालुकासंघटक, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, सरपंच, ग्रा.पं. सदस्य तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी उरण तालुक्यातील जे एन पी टी परिसरातील वाहतूक व इतर समस्यांची पाहणी केली त्यामुळे उरण तालुक्यातील महत्वाची असलेली वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.