सिटी बेल| आरोग्य प्रतिनिधी | मुंबई |
२९ सप्टेंबर हा जागतिक हृदयदिन म्हणून जगभर साजरा होतो. तणावग्रस्त जीवनशैली, वाढता मधुमेह व उच्च रक्तदाब यामुळे हृदयविकार वाढत असून कोरोनानंतर हृदयविकार वाढीस लागले आहेत. जागतिक हृदय दिनानिमित्त अनेक सेवाभावीसंस्था, हॉस्पिटल जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबवीत असतात व याच निमित्ताने घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलने संपूर्ण इमारत लाल रंगाची ( लाल रंगाच्या लाईट्स ) केली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे बिजिनेस डेव्हलपमेंट प्रमुख श्री आशिष शर्मा म्हणाले, ” जागतिक हृदयदिनानिमित्त आम्ही संपूर्ण
महिनाभर अनेक उपक्रम राबविले असून यामध्ये डॉक्टरांची चर्चासत्रे, मोफत आरोग्य शिबीर, मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. हे सर्व करीत असताना आम्हाला या लाल रंगाची संकल्पना सुचली. मुंबईत अनेकवेळा जागतिक स्तन कर्करोग दिनानिमित्त अनेक इमारती या गुलाबी रंगाच्या करण्यात आल्या होत्या. मुंबईत पहिल्यांदाच आमच्या इमारतीने लाल रंग परिधान केला असून मुंबईकरांना या ह्रदयदिनाचे महत्व आम्ही पटवून देऊ अशा विश्वस आम्हाला वाटत आहे.”
सध्या जगभरात हृदयरोगांमुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या आकडेवारीनुसार दरवर्षी १ कोटी ७३ लाख लोक हृदयरोगाने मृत्यूमुखी पडतात. भारतातील एकूण मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू हृदयरोगाने होत असतात. गेल्या काही दशकांपासून हृदयरोगाचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत असल्याचे दिसून आले आहे. पाश्चिमात्य जगाच्या तुलनेत भारतामध्ये वयाची १० वर्षे आधी हृदयरोग होताना दिसू लागले आहेत अशी माहिती झायनोव्हाचे संचालक वसंत जाधव यांनी दिली.
झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे मुख्य ऍडमिन अधिकारी डॉ. शिवाजी दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे विविध उपक्रम आयोजित केले होते.







Be First to Comment