सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी अंतर्गत तसेच ग्रुप ग्रामपंचायत देवकान्हे यांच्या सहकार्याने शिवप्रेमी गावदेवी मित्र मंडळ तसेच ग्रामस्थ व महिला मंडळ बाहे यांच्या पुढाकाराने सरपंच वसंत भोईर व सदस्य यांच्या विशेष प्रयत्नातून बाहे येथील हनुमान मंदिर सभागृहात कोविड शिल्डचा पहिला व दुसरा डोस येथील लाभार्थ्यांना देण्यात आला.
सार्वजनिक साखर चौथ गणपती उत्सव दरम्यात गावातील युवा मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने एक चांगला उपक्रम राबविण्यात आला असून यावेळी विविध परिसरातील व गावातील नागरिकांना १५० व्यक्तींना पहिला डोस तर २० व्यक्तींनी दुसरा असे एकूण १७० जणांनी घेतला कोरोना लस डोसचा लाभ घेतला.
तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्यासह राज्यात शेती,भाजी लागवड व्यवसायात प्रगतशील असलेले बाहे गाव कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या शेतातील ताजी भाजी घरोघरी रास्त दरात पोहचवण्याचे काम केले परंतु डोस साठी येथील नागरिकांना खांब,कोलाड,रोहा किंवा इतरत्र ठिकाणी जावे लागत होते परंतु गावातील तरुण युवा पिढीने याचा सारासार विचार करून सार्वजनिक उत्सव काळात एक सामाजिक बांधिलकी ठेवत प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी ,ग्राम पंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हे कोविडशिल्डचे डोस देण्यात आले ,
यावेळी प्रमुख उपस्थिती देवकान्हे ग्राम पंचायत सरपंच वसंत भोईर, सदस्य विलास थिटे, दयाराम भोईर, अदिती थिटे, रवींद्र राऊत, ग्राम सेविका पिंपळकर, पोलीस पाटील मनोज थिटे, आंबेवाडी उपकेंद्र आरोग्य सेविक अपर्णा मखर मॅडम, आशाताई स्वाती ठाकूर,वेदिक टेंबे,सुप्रिया तुपकर, कॉम्पुटर ऑपरेटर पूजा भोईर,सानिका भोईर,आदी ग्रामस्थ महिला उपस्थित होते
प्रसाद गोविलकर, हेमंत ठाकूर,ज्ञानेश्वर देवकर,विशेष सहकार्य, राजेश ठाकूर, काशीनाथ थिटे,मंगेश साळसकर सह मंडळाच्या सर्व युकांनी सदरच्या उपक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.
Be First to Comment