मी कोल्हापूरला जाणारच, महाराष्ट्र घोटाळा मुक्त करणार, हे सरकार तर घोटाळेबाजांच सोमय्या यांचा आरोप
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
19 सप्टेंबरला मी कोल्हापूरला अंबे मातेचं दर्शन घेऊन तक्रार दाखल करायला निघालो होतो मात्र मला जाऊन दिल नाही. परंतु आता सिद्धिविनायकाच दर्शन घेऊन मी दिनांक 28 सप्टेंबर रोजी कोल्हापूरला जाणार जगतजननी अंबे मातेचं दर्शन घेऊन कागल पोलीस ठाण्यात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याबाबत तक्रार दाखल करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ज्यांच्यात हिम्मत आहे त्यांनी मला अडवून दाखवा असे खुले आव्हान भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी दिले आहे. अलिबाग येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यासाठी संबंधित पोलिसात ठाण्यात तक्रार करायला किरीट सोमय्या हे कोल्हापूरला दिनांक 19 सप्टेंबर रोजी निघाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी त्यांना जिल्हाबंदी केली होती. त्यामुळे 20 सप्टेंबर रोजी सोमय्या यांना कराड येथे उतरवण्यात आलं होतं. तेव्हा घोटाळ्याच्या पार्शवभूमीवर त्यांनी दौरा जाहीर केला होता. त्यानुसार ते आज दिनांक 26 सप्टेंबर रोजी रविवारी अलिबाग येथे उपस्थित राहिले.
यावेळी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली पुढील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, गेले अलिबाग कोर्लई येथे 19 बंगल्याचा ठाकरे व वाईकर यांचा घोटाळा बाहेर काढला होता. 11 नोव्हेंबर 2020 रोजी या घोटाळ्याबाबत मी मुंबईच्या भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली होती. व ठाकरे वाईकर यांचे अन्वय नाईक यांच्या सोबत झालेले कराराचे पेपर त्यावेळी दाखवले. त्याच्या दुसऱ्या दिवशी कोर्लई येथील 19 बंगल्याची 8 वर्षांची घरपट्टी ठाकरे वायकर यांनी स्वतःच्या बँक खात्यातून ग्रामपंचायतमध्ये भरली.
तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 10 महिने मी महेश मोहिते, आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक रायगड आम्ही सगळे
19 बंगले गेले कुठे ? याचा शोध घेतोय. येथे यांचे 19 बंगले चोरीला गेले. त्याचा आम्ही शोध घेतोय पण उलटपक्षी वाईकर यांनी माझ्यावर अब्रू नुकसानीचा 100 कोटींचा दावा दाखल केला. अब्रू नुकसान सारखे मी केलं तरी काय हेच मला आजवर समजलं नाही असा खोचक प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला.
तर शिवसेनेचे मुखपत्र असलेले सामनाच्या अग्रलेखात आज खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचे आरोप हे साबणाचे बुडबुडे म्हणत त्यांच्यावर टीका केली होती त्याचा खरमरीत समाचार घेत माझे आरोप बुडबुडे आहेत मग त्याची दखल घेत लेख का लिहिता ? संजय राऊत यांना मला प्रश्न विचारण्याचा अधिकार काय ? असा सवाल त्यांनी केला. तसेच 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुरदर्शी दिवशी मला गणपती विसर्जनाला बाहेर पडू दिल नाही.
अंबे मातेचं दर्शन करू दिल नाही त्या हसन मियाँना मी उत्तर देणार. परवा मी कोल्हापूरला जाऊन कागल पोलीस ठाण्यात त्यांच्या घोटाळ्याची तक्रार दाखल करणार. हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला अडवून दाखवाच आता असे खुले आव्हान त्यांनी याप्रसंगी दिले. हसन मुश्रीफ यांचा सरसेनापती साखर कारखाना, गडहिंग्लज साखर कारखाना आणि आता तिसरा घोटाळा याची तक्रार दाखल करत मुश्रीफ यांच्यावर कारवाई करून दाखवणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.













Be First to Comment