आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
अलिबाग नगरपरिषद हद्दीतील श्रीबाग नंबर दोनच्या नागरिकांसाठी कोव्हिडं प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन अलिबाग शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते.या शिबिरात 340 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
कोरोना महामारी पासून बचावा करता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सर्वत्र सुरू आहे. अलिबाग तालुक्यातील अलिबाग नगरपरिषद हद्दीतील मौजे श्रीबाग नंबर दोन येथील नागरिकांसाठी अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन श्रीबाग येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात राबविण्यात आले.श्रीबाग परिसरातील
जास्ती जास्त नागरिकांनी नोंदणी करून लसीकरण करून घेण्याचे आवाहन अलिबाग शिवसेनेच्या वतीने करण्यात आहे.

श्रीबाग परिसरसह अलिबाग शहर कोरोना मुक्त करण्याचे तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लस नागरिकांनी टोचून घेतल्यास कोरोनाशी लढण्याचे बळ येईलच शिवाय कोरोना हद्दपार होईल असा विश्वास अलिबाग शहर प्रमुख संदीप पारकर यांनी व्यक्त करत
या शिबिराचे उद्घाटन तालुखाप्रमुख राजा केणी यांनी केले होते.
यावेळी अलिबाग शहर प्रमुख श्री. संदीप पालकर,संघटीका रंजिता शिंदे ,ढोरे ताई, उपशहर प्रमुख वसंत जैन, श्रीबाग शाखा प्रमुख अक्षय म्हात्रे ,शाखा संघटक ऋषिकेश सूर्यगंध , सुजित पाटील, कुणाल वाघेला, मंगेश म्हात्रे, सुनील ढोरे, पियुष पोवार, विनेश चव्हान, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.







Be First to Comment