Press "Enter" to skip to content

शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पागोटे च्या रक्तदान शिबीराला उत्तम प्रतिसाद

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पागोटे तर्फे दरवर्षी विविध अध्यात्म,संस्कृती , शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. हे मंडळ गेली १८ वर्षे साखर चौथच्या दिनी गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करीत आला आहे.केवळ मौजमजा करमणूक म्हणून बाप्पाची स्थापना न करता प्रत्येक मंडळाने विविध उपक्रम राबवले पाहिजे या उद्देशाने गेली १८ वर्षे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न म्हणून अनेक सामाजिक उपक्रम मंडळाने राबविले आहे.त्यातीलच जवळपास ७ वर्षे नियमित राबवित असलेला उपक्रम आणि सध्याच्या कोरोना काळात ज्याची नितांत गरज आहे असा उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर.

यावर्षीही शनिवार दि २५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९:३०ते दुपारी ३ या वेळेत श्री काशीनगर चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडप, पागोटे, तालुका उरण या ठिकाणी सद्गुरू चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई यांच्या सहकार्याने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.इच्छुक रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून या शिबिरात रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला.एकूण 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले.सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पागोटे या मंडळाच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.यावेळी सामाजिक, राजकीय व कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.